जळगाव : प्रतिनिधी
आज रात्री ८ ते ९ वाजे दरम्यान आकाशातून एक उल्का पडल्यासारखा तेज शलाका दृष पहायला मिळाले नागरिकांनी याचा व्हिडिओ व फोटो सर्वत्र व्हायरल झाल्याने शहरासह जिल्ह्यात अनेक चर्चा रंगू लागल्या.
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या *इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत…
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत ..
श्रीनिवास औंधकर,
संचालक
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद




















