जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४
पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क बियरबारच्या दुकानाचे कुलूप तोडून देशी-विदेशी दारू चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी २० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता हातेड गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. हातेड ता. चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क बियरबार फोडल्याची घटना घडली होती. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, गुन्हा करताना वापरलेले आणि गुन्हा करण्याची पद्धत ही यापूर्वीचा रेकॉर्डवरील संशयित आरोपी शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी याची असल्याची असल्याने. पोलीसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील चौकशीसाठी त्याला पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ संदीप पाटील, प्रविण मांडोरे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहूल कोळी यांनी केली आहे.