जळगाव मिरर । १४ सप्टेंबर २०२३
सध्या सगळ्याकडे गणेशोस्तवाचे वातावरण सुरु असून येत्या काही दिवसात गणरायांचे आगमन होत आहे. पण यंदाच्या गणेशोस्तवात एक गाण्याने मोठा धुमाकूळ घातला आहे ते म्हणजे ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे आता लोकप्रिय होऊ लागले आहे. पण या गाण्याची नेमकी काय आहे सुरुवात हेच जाणून घेऊ या.
बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता.त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झालं. ज्याच्या त्याच्या मोबाईलवर सध्या हेच गाणं वाजतंय. पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना ठाऊक आहे. कोण आहेत या गाण्यामागे जाणून घ्या.गणपती बाप्पाच्या आगमनाला काही दिवस राहिले असतानाच ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे प्रचंड प्रमाणात राज्यात गाजत आहे.
या गाण्याचा मूळ गीतकार चक्क एक वडापाव विक्रेता आहे. या गीतकाराने पाच वर्षापूर्वी वडे तळता तळता या गाण्याची धून तयार केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलांनी गेल्या वर्षी हेच गाणे गायले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले होते. मात्र त्या मानाने त्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती.
पण आता हे गाणं चांगलंच गाजत असून त्या चिमुकल्या मुलांची आणि मूळ लेखकाची सगळेच जण दखल घेत आहेत.छोटा पडदा गाजवल्यानंतर अभिनेत्रीची रंगभूमीवर एंट्री; नव्या नाटकाची पहिली झलक समोर’आमच्या पप्पानी गणपती आणला’ हे गाणं मुंबईतील भिवंडी भागातील वडापाव विक्रेता मनोज घोरपडे याने लिहिलं आहे. तर त्यीचीच मुलं त्यांचा मोहित आणि मुलगी शौर्य यांनी हे गाणं गायलं आहे. आपल्या मुलांनी गायलेलं आणि आपण लिहिलेलं हे गाणं केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालतंय याचा मनोज घोरपडे यांना खूप आनंद वाटतो आहे. या गाण्याने श्री गणेश भक्तांमध्येही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.मध्यमवर्गीय घोरपडे कुटुंबीय वडापाव विकून उदरनिर्वाह करते. मनोज यांना लहानपणापासूनच लिहिल्याचा छंद आहे. वडापाव करताना सुद्धा त्यांनी हा छंद आनंदाने जोपासला आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी त्यांनी ‘आमच्या पप्पांनी आणला’ हे गाणे लिहिले होते. त्यानंतर आपल्या मुलांकडूनच गेल्यावर्षी त्यांनी हे गाणं गाऊन घेतलं. मागील वर्षी बनविलेल्या या गाण्याला वर्षभरात दोन मिलियन व्हूज मिळाले होते, पण साईराज केंद्रेचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर मात्र हे गाणं ऐकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.यंदाच्या गणेशोस्तवात प्रत्येक मंडळात हे गाणं वाजणार हे निश्चित. आता यानंतर मनोज आणि त्यांच्या मुलांचं पुढे कोणतं गाणं येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.