जळगाव मिरर | १३ सप्टेंबर 2023
राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याच्या अनेक जिल्ह्यात दौरे करीत असताना जळगाव जिल्ह्यात अजित पवारांनी बळ दिले आहे. जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटलांची नुकतीच नियुक्ती केली आहे.
जळगाव शहर मतदार संघात २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढविले अभिषेक पाटील हे अजित पवार यांच्या गटासोबत होते. त्यानंतर जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी आता अभिषेक पाटील यांची नियुक्ती करून अजित पवारांनी जळगावात राष्ट्रवादीला मोठे बळ दिले आहे. अभिषेक पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांना दिले आहे.
नियुक्ती पत्रात म्हटलं आहे कि, आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सर्वसामन्यापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाच वर्षाव होत आहे