अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्ताने साजरा होणारा ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील सार्वजनिक ग्रंथालये महाविद्यालये व शाळांमध्ये जाऊन ग्रंथपाल दिनानिमित्त त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १९ ग्रंथपालांना राष्ट्रसंत गाडगेबाबांचे मानव सेवा योगी संत गाडगे महाराज प्रा. डॉ रंजनीताई लुंगसे लिखित पुस्तिका देऊन डेबुजी झिंगराजी जाणोरकर ( संत गाडगेबाबा )ग्रंथालयाचे अध्यक्ष दिपक उखर्डु वाल्हे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. अमळनेर युवा परीट धोबी मंडळ व पूज्य साने गुरुजी ग्रंथालय वाचनालय अमळनेर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले