जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२४
गावठी कट्टा घेऊन पारोळा तालुक्यातील देवगाव येथे दहशत पसविण्यासाठी फिरत असलेल्या सुहास भरत बाविस्कर (३८, रा. कानळदा, ता. जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूसे जप्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव येथे एकजण गावठी कट्टा घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अनिल जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदीप चवरे यांचे पथक कारवाईसाठी पाठविले. पथकाने देवगाव येथून सुहास बाविस्कर याला अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, चार हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतूसे हस्तगत केली.