धानोरा ता.चोपडा : वार्ताहर
जळगाव जिल्ह्यात बसच्या अपघाताची मालिका नियमित सुरु असून आज पुन्हा सकाळी चोपडा तालुक्यातील धानोरा या गावाजवळ बस घसरल्याने एक प्रवासी जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गुरुवार रोजी सकाळी ७.३० वाजता चोपडा आगाराची चोपडा – संभाजीनगर एसटी बस क्र.MH-20 BL-2538 धानोरा येथुन काही अंतरावरील जितेंद्र पांडूरंग महाजन यांच्या शेताजवळील वळणावर तुरळक पाऊस पडत असतांना बस घसरून गाडी सरळ ब्रासमध्ये गेली चालक प्रविण शेटे यांनी समयसुचकता दाखवत गाडी उभी केली. तरीही या घटनेत मोहरद येथील रविंद्र सुरेश पाटील (वय ५५) यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना धानोरा प्रा.आ .केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
या गाडीत ४५ प्रवाशी होते. अशी माहीती वाहक रुषीकेश कोळी यांनी दिली. घटना घडताच पो.पा.रविंद्र कोळी , ज्ञानेश्वर सोनवणे, किरण कोळी, नवल कोळी, पिंटू पाटील, गजानन चौधरी आदीनी मदत केली.
एकाच ठिकाणी बसचा दुसऱयांदा अपघात
काही महिन्यापूर्वी याच बसचा या ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले होते, त्या घटनेची आज देखील पुरावृत्ती झाली आहे.