जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात चोरीच्या घटनेमध्ये नियमित वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील फुलगावसह वरणगावातील रेणुकानगर परिसरात दि. ८ रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत आठ ते दहा घरांची कुलपे तोडून दोन तोळे सोने व सहा हजार रोख रक्कम लांबवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील रेणुकानगरमध्ये चोरट्यांनी चार ते पाच घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच फुलगावमध्ये एका घरातून दोन तोळे सोने व सहा हजार रु रोख रक्कम चोरून नेल्याचा अंदाज आहे. रात्री दोन ते तीन वाजेदरम्यान काळे रेनकोट अंगात घातलेले तीन चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलगाव येथील घराचे मालक बाहेर गावी गेले आहेत. ते रविवारी परत येतील. आल्यावर तक्रार देणार असल्याची माहिती आहे. तर, संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोलिसांत कुठलीच नोंद झालेली नव्हती. पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच, तपास सुरू आहे