जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२३
राज्यातील जालना येथे डेंग्यू सदृश तापाने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भोकरदन शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन शहराजवळील आलापूर गावातील 28 वर्षीय वंदना रामेश्वर गायकवाड या महिलेला दोन ते तीन दिवसापासून सतत ताप येत होता. नातेवाईकांनी महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र ताप कमी न झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
महिलेला डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याचे निदान झाले होते. भोकरनमधीलच वाडी बुद्रूक येथील शिवाजी सखाराम चोरमारे यांचा दोन वर्षाचा मुलगा खुशील याला सुद्धा गेल्या आठवड्यापासून तापाची लागण झाली होती. उपचारासाठी त्याला भोकरदन शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होता.
मात्र ताप कमी होत नसल्याने त्याला उपचारसाठी औरगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल दुपारी उपचारादरम्यान त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.