जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२३
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी चक्क सात दुकाने व लक्ष्मी नगरातील एक बंद घर फोडून चांगलीच घबराट निर्माण केली आहे.
शुक्रवारी रात्री पाऊस सुरू होता व नेहमीप्रमाणे वीजपुरवठाही बंद होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यावल बसस्थानक परिसरातील दुकाने फोडली. अमरदीप गुजर यांचे सूर्यवंशी टी सेंटर, रावसाहेब पाटील यांचे सातपुडा कृषी केंद्र, राजेंद्र चौधरी यांचे कांचन प्रिंटर्स जनरल स्टोअर्स, अडावदकरांचे जनता फ्रुट कंपनी व सद्गुरू दूध उत्पादक सोसायटी ऑफिस व शेजारील खोली असलेल्या या सर्व दुकानांची टॉमीने कुलूपे तोडून रोख रक्कम, चिल्लर व तर लक्ष्मी नगरातील गोकुळ कुंभार यांचे बंद घरात चोरी केल्याची घटना घडली.
यात अनेक दुकानदारांच्या दुकानातील चिल्लर तसेच सूर्यवंशी टी स्टॉलमधून दोन हजार रुपये व सिगारेटची पाकिटे असा ऐवज चोरांनी लंपास केला. इतर दुकानातील काय ऐवज चोरीस गेला, याबाबतची माहिती कळू शकले नाही. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या वेळेत महावितरणचा वीजपुरवठा बंद होता तर संततधार पाऊसही सुरू होता. पहाटे चार वाजता प्रशांत अंबादास महाजन हा दूध काढण्यासाठी जात असताना त्याच्या लक्षात आल्यावर त्याने दुकानदारांना कळवले. दुकानदारांनी आपल्या दुकानांकडे धाव घेत पोलिस पाटील रवींद्र कोळी यांनाही बोलवले. त्यांनी पाहणी करून तत्काळ अडावद पोलिस ठाण्यात माहिती दिली. मात्र, सात ते आठ दुकानांचे कुलूप तोडून चोरीची गंभीर घटना घडूनही पोलिसांनी या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले