जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील प्रत्येक नागरिकांना प्रवासासाठी नेहमीच रेल्वेने उत्तम प्रवास होत आहे. सध्या आगामी सण, उत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मुंबई- हजूर साहिब नांदेड दरम्यान चार उत्सव विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
२४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत गाडी क्र. ०७४२७ स्पेशल- लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल. तसेच ०७४२६ ही गाडी २३ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी रात्री ९.१५ वाजता हजूर साहिब नांदेडहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत आणि पूर्णा येथे थांबे असतील.
याशिवाय क्र. ०७४२९ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर गुरुवारी दुपारी ४.५५ वाजता २६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल. तसेच क्र.०७४२८ ही गाडी २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी रात्री ९.१५ वाजता हजूर साहिब नांदेड येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत आणि पूर्णा इथे थांबे असतील. रविवार, दि. २२ पासून आरक्षण सुरु झाले आहे