अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित अमळनेर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डीवायएसपी सुनिल नंदवाळकर,उद् घाटक धनदाई संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील होते.प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष तथा जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रावसो.के.डी पाटील ,प्राचार्य प्रा. डॉ अनिल पाटील उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेमध्ये१४, १७ व १९ वर्षे वयोगटा आतील मुलांच्या संघाने सहभाग घेतला,यात एकूण १० मॅचेस खेळविल्या गेल्या, यात ४९ संघ सहभागी झाले होते ,अचानक पाऊस आल्याने मैदानात पाणी साचले म्हणून उर्वरित सामने पूढे ढकलले असून हवामान अंदाज घेऊन खेळविण्यात येणार आहेत असे आयोजकांनी कळविले आहे. यावेळी अमळनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष एस पी वाघ, विजय बोरसे, महेश माळी, निलेश विसपुते यांची उपस्थिती होती तसेच
क्रीडा शिक्षक एस आर जाधव प्रा.शैलेश पाटील ,के.बी पाटील, प्रा.पी.पी तुरणकर हे उपस्थिती होते.
क्रीडा शिक्षक बाबुराव सांगोरे, स्वप्नील पाटील,एस आर जाधव, पंकज पाटील, विनोद पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी अमळनेर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले.