जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्हा परिट धोबी सेवा मंडळ व जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेतर बहुद्देशीय मंडळ आयोजित “जळगाव जिल्हा धोबी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा” दिनांक ६ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृह ख्वाजामिया दर्ग्याजवळ गणेश कॉलनी जळगाव येथे संपन्न झाला यात एस.एस. सी, एच एस.सी.पदवी, पदविका, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्राविण्यप्राप्त विद्यार्थी, शासकिय चित्रकला परीक्षा, राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडू अश्या एकूण १६४ पुरस्कार्थींना गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे तर प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ रमेश माने, नगरसेवक गणेश सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, सहायक सरकारी वकील राहुल रोकडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप चांदेलकर, लिलकांत महाले व माणिक सपकाळे, सहायक वाहन निरीक्षक पुरुषोत्तम शेवाळे, धोबी समाजाचे माजी अध्यक्ष भास्करराव वाघ यांची उपस्थिती होती प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले स्वागतगीत व महाराष्ट्र गीत संजय क्षिरसागर व प्रशांत सोनवणे यांनी सादर केले याप्रसंगी PSI म्हणून नियुक्ती झालेले कोमल शिंदे, जयवंत येशीराव, लिलकांत महाले व माणिक सपकाळे, आर टी ओ विभागात सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पुरुषोत्तम शेवाळे, एच एस सी परीक्षेत विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम आलेली दीपिका चव्हाण, सी.ए.परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणारे मयुर सपकाळे, अभियांत्रिकी परीक्षेत विशेष प्राविण्यप्राप्त लिना सपकाळे, बी टेक परीक्षेत प्राविण्यप्राप्त तेजस खैरनार, वैद्यकीय पदवी प्राप्त करणारे डॉ मयुरेश माने, डॉ यश जाधव, डॉ मोहित सोनवणे, शारीरिक शिक्षणात पी.एच डी मिळविणारे डॉ राज रोकडे, सहायक सरकारी वकील परीक्षा उत्तीर्ण ऍड.राहुल रोकडे, एल एल बी परीक्षेत विशेष प्राविण्यप्राप्त जितेंद्र खर्चाने, एम लिब परीक्षेत विशेष प्राविण्यप्राप्त अमळनेर येथील संत गाडगेबाबा वाचनालयाचे अध्यक्ष दिपक वाल्हे, जिल्हा न्यायालयाचे तथा उत्कृष्ठ सूत्रसंचालक अनिल शिंदे, पिंक रिक्षा चालक सुनीता सपकाळे तसेच पोलीस दलात नियुक्त झालेले अक्षय ठाकरे,गिरीश शेवाळे,प्रवीण निकुंभ, आकाश सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष गणेश बच्छाव व सचिव अरुण सपकाळे यांनी केले आभार प्रदर्शन संजय खैरनार यांनी तर यशस्वीतेसाठी शिक्षक मंडळाचे पदाधिकारी उमेश्वर सुर्यवंशी, विनोद शिरसाळे, चंद्रकांत वाघ, रमेश ससाणे, जितेंद्र खर्चांणे, मनोज वाघ, विजय शेवाळे, गणेश सपके, प्रशांत मांडोळे, किशोर शिरसाळे, सतीश वाघ, देविदास वाल्हे, विशाल जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली




















