जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२३
तुम्ही महिलांची लाईन लावतात तसेच मला पण एक महिला पूरवा असे बोलून एकाने ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील एका गावातील काही महिला एका कंपनीत नियमित काम करण्यासाठी जात असतात याच कंपनीतील एका व्यक्तीने एका महिलेला कामावरून काढले याचे कारण विचारण्यासाठी काही महिला गेल्या असता दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ४२ वर्षे महिला कंपनीत जाऊन त्या संशयित आरोपीला आमच्या ग्रुपमधील महिलांना कामावर कमी का केले याचा जाब विचारला असता त्याने महिलांना शिवीगाळ करून तुम्ही महिलांची लाईन लावतात माझी सुद्धा एखाद्या महिलेची लाईन लावा तसेच मला पण एक महिला पूर्वा असे बोलून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलला या सोबत धमकी सुद्धा दिली
तू माझ्या नावाची कुठेही कंप्लेंट करून टाक किंवा फाशी घेऊन टाक मी कुणाला घाबरत नाही तसेच या महिला सोबत जाणाऱ्या काही महिलांना देखील शिवीगाळ करीत धमकी दिल्या प्रकरणी संशयित आरोपी राजेश नाम इसमाविरोधात कासोदा पोलीस स्थानकात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कासोदा पोलीस स्थानकाचे सपोनी योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका नितीन सूर्यवंशी हे करीत आहे.