अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १ हजार ८६ प्रलंबित खटल्यांपैकी ९६ खटले निकाली निघाले. यात २ कोटी ९९ लाख २४ हजार ८६२ रुपये वसुली झाली. तर ३ हजार ६२८ वादपूर्व खटल्यांपैकी ४३० खटले निकाली निघून यात २९ लाख ५६ हजार ४१० रुपये वसुली झाली.
पॅनल क्रमांक १ मध्ये पॅनलप्रमुख जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी, पॅनल पंच म्हणून अॅड. आर. व्ही. निकम होते. पॅनल क्रमांक २ मध्ये पॅनलप्रमुख न्यायाधीश पी. पी. देशपांडे तर पॅनल पंच म्हणून अॅड. एस. एन. पाटील होते. पॅनल क्रमांक ३ मध्ये पॅनलप्रमुख म्हणून न्यायाधीश एन. आर. येलमाने तर पॅनल पंच म्हणून एन. व्ही. सूर्यवंशी होते. पॅनल क्रमांक ४ मध्ये पॅनलप्रमुख न्यायाधीश एस. एस. जोंधळे तर पॅनल पंच म्हणून अॅड. ए. बी. महाजन होते.
या लोकअदालतमध्ये सरकारी वकील अॅड. के. आर. बागूल, अॅड. आर. बी. चौधरी, वकील संघाचे वरिष्ठ विधिज्ञ अॅड. व्ही. डब्ल्यू, वाणी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य, तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित हो