जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२३
जगभरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात सरकारच्या कामावर असमाधानी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या मुद्यावर चर्चा केली आहे.
जगासमोरील प्रमुख समस्या म्हणजे महागाई असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते म्हणाले की कोरोना महामारी आणि नंतर युद्धामुळे जागतिक महागाई वाढली आहे. त्यामुळे विकसित देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था या दोन्ही देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. हा एक जागतिक मुद्दा आहे.
ते म्हणाले की, आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात, G20 अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांची बैठक झाली होती. महागाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने स्वीकारलेल्या धोरणांचा इतर देशांवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे फोरमने मान्य केले. याव्यतिरिक्त, मध्यवर्ती बँकांद्वारे धोरणात्मक भूमिका वेळेवर घेणे गरजेचे आहे