अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर रेल्वे स्थानकावर एका अनोळखी तरूणाचा रेल्वेतून पडून जखमी होत उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
जी.आर.पी पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून अमळनेर रेल्वे स्थानकावर २९/०८/२३ रोजी रात्री ११:०० वाजता मेमो एक्सप्रेस मधून एका तरुण इसम पडल्याने जखमी झाला असता घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासणी केली असता सदरील तरुण/पुरुष अनोळखी असल्याचे समजले याबाबत जखमी तरुणाला उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असता त्या अनोळखी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असुन ओळख पटविण्याचे आव्हान अमळनेर लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. (संपर्क साधावा 9923050831) मृत व्यक्तीचे वर्णने- अंदाजीत वय २५ ते ३० वर्ष, रंग गोरा, उंची ५×५, केस काळे, बारीक दाढी- मिशा, हातांवर चार ठिकाणीं गोंधन काढलेले तसेच अंगावर पांढरा शर्ट काळ्या रंगाचे फुले व काळी जिन्स असे वर्णन असून पुढील घटनेचा तपास पो. हवलदार अलका अढाळे करीत आहे