• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘राष्ट्रीय विचार प्रबोधन’ राज्यात एक मॉडेल होऊ शकते ; श्रीमंत कोकाटे !

Team Jalgaon Mirror by Team Jalgaon Mirror
September 9, 2023
in जळगाव, देश-विदेश, सामाजिक
0
‘राष्ट्रीय विचार प्रबोधन’ राज्यात एक मॉडेल होऊ शकते ; श्रीमंत कोकाटे !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

“महापुरुषांची विचारधारा समजून घेत कालानुरूप विकसित करणे आवश्यक बाब असून अमळनेरमध्ये राबवित असलेले राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान हे संपूर्ण राज्यासाठी एक मॉडेल होऊ शकते” महापुरुषांच्या विचारांवर आधारित फेब्रुवारी २०२४ मध्ये अंमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास जनतेने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले.

येथिल छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रा. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच आयोजित प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते श्रीमंत कोकाटे यांनी बोलतांना पुढे सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर आदी महामानवांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा दाखला देत कोणत्याही कठीण प्रसंगात डगमगून न जाता आपल्या विचारधारेवर निष्ठा ठेवून संघर्ष करत राहिल्यास यश प्राप्त होते असे प्रतिपादन केले.

महापुरुषांचा वारसा हा विज्ञानवादाचा आणि प्रयत्नवादाचा असून अतार्किक, अवैज्ञानिक अंधश्रद्धा झुगारून देत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या प्रयत्नवादी आणि कृतीप्रवण मार्गावर वाटचाल करावी असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले. विज्ञानवाद हा केवळ विचारात असून चालत नाही तर आपले रोजचे जीवन, आहार, विहार यात देखील अंमलबजावणी करीत या विचारधारेला महिला स्वातंत्र्य आणि महिलांचा सन्मान याची जोड दिल्यास समाजात सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येतील असे प्रतिपादन केले. प्रा.अशोक पवार सातत्याने विविध महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत शेकडो वक्ते तयार करून राबवीत असलेले राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानचे मॉडेल प्रेरणादायी ठरेल असेही कोकाटे यांनी सांगितले.

यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी प्रा. पवारांशी संबंधित विविध आठवणींना उजाळा देत शैक्षणिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला.

प्रास्ताविकात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी “सामाजिक प्रबोधनाचे काम करणाऱ्या प्रा.पवारांसारख्या व्यक्तींचा जन्मदिवस हे प्रबोधनपर व्याख्यानानेच साजरे व्हावेत हा आदर्श सदर व्याख्यानाने निर्माण केल्याचे सांगितले.

सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बोरसे, राष्ट्रसेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी हि यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी केले. जिजाऊ वंदना सौ.वसुंधरा लांडगे यांनी गायली तर आभार प्रदर्शन डी. ए. पाटील यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय गौतम मोरे यांनी करून दिला.

याप्रसंगी विविध सामाजिक संगटना,पदाधिकारी यांचे वतीने प्रा.अशोक पवार यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमळनेर मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी एच.टी.माळी,श्रीमती कोकिळाबेन शहा ट्रस्टचे अध्यक्ष चेतन भाऊ शहा, भारती गाला,निवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, माजी नगरसेवक शाम पाटील,एस डी देशमुख, बन्सीलाल भागवत, नितीन निळे,पन्नालाल मावळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, अजय भामरे, सोपान भवरे, योगेश पाटील, अशोक पाटील, यतीन पवार, प्रा डॉ माणिक बागले, प्रा.डॉ.राहुल निकम आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !
क्राईम

शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

September 28, 2023
रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !
जळगाव

रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

September 28, 2023
जळगावात १२ गुन्हेगारांना शहरात बंदी !
क्राईम

जळगावात १२ गुन्हेगारांना शहरात बंदी !

September 28, 2023
‘पिक्चर अभी बाकी है’ : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला विरोधकांना इशारा
जळगाव

मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय : ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी जाहीर !

September 27, 2023
चाळीसगाव : पतीने केला पत्नीचा क्रूर पद्धतीने खून !
क्राईम

चाळीसगाव : पतीने केला पत्नीचा क्रूर पद्धतीने खून !

September 27, 2023
लोक वर्गणी व पाणीपट्टीवर वरील व्याजदर रद्द करावे !
जळगाव

लोक वर्गणी व पाणीपट्टीवर वरील व्याजदर रद्द करावे !

September 27, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

April 15, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !

September 28, 2023
गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !

गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !

September 28, 2023
शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

September 28, 2023
रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

September 28, 2023

Recent News

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group