जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२३
राज्यातील अमरावती मतदार संघ नेहमीच राजकीय वक्तव्याने चर्चेत येत असतांना पुन्हा एकदा हा जिल्हा चर्चेत आला आहे. या मतदार संघट काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्यात नेहमीच राजकीय सामना रंगला जात असतो. नवनीत राणा यांनी ठाकूर यांच्यावर आमच्याकडून पैसे घेऊन दुसऱ्यांचा प्रचार केल्याचा आरोप केला. त्याला आता यशोमती ठाकूर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
रवी राणा तू चोर आहे. तुझी बायको चोर आहे. तुम्ही आमच्यावरील सिद्ध करून दाखवा, अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या. आम्ही असे आरोप सहन करणार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
यशोमती ठाकूर या प्रकरणी राणांवर निशाणा साधताना म्हणाल्या की, शहाण्यांना सांगा लायकीत रहा. माझ्या बापाने आणि कुटुंबाने येथे जमिनी घेण्याचे नाही तर देण्याचे काम केले. आजही निवडणुकीत आम्हाला एखादा एकर शेतीर विकावी लागते. ही फॅक्ट आहे. त्यामुळे आम्ही राणांसारखी फालतुगिरी सहन करणार नाही. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपत जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. ठाकूर यांनी त्यांच्या या आरोपांचाही खरपूस शब्दांत समाचार घेत त्यांना औकातीत राहण्याचा सल्ला दिला आहे.