अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील मारवड महसूल मंडळात सात्री परिसरात झालेल्या जोरदार पावसाने ज्ञानेश्वर बाबुलाल बोरसे आणि छबीलाल रजेसिंग भिल यांची घरे कोसळली. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही.
ज्ञानेश्वर पाटील हा अल्पभूधारक आहे. त्यातच त्याची जमीन निम्न तापी प्रकल्पात गेली. घरात आई, पत्नी आणि दिव्यांग मुलगा आहे. ज्ञानेश्वर याचीही प्रकृती बरी नसते. तर छबीलाल भिल हा शेतमजूर आहे. तोदेखील बेघर झाला आहे. पोलिस पाटील विनोद बोरसे, सायीमल पावरा व विजय भिल यांनी मलबा काढण्यास मदत केली. मात्र, घरातील सर्व साहित्य उघड्यावर पडले आहे. पोलिस पाटलांनी महसूल विभागाला माहिती कळवली आहे. दरम्यान, दोन्ही गरीब कुटुंबाचे संसार उघड्यावर आलेले पाहून उपस्थितांना गहिवरून आले