जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्हा कारागृह नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत येत असते. आज देखील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते म्हणजे एक बंदी असलेल्या कैदीने बॅरेकमध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात असलेला बंदी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याने बॅरेकमध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. वेळीच इतर बंद्यांनी त्याचे पाय धरुन ठेवत त्याला खाली उतरविले. या बंद्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





















