जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२३
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे बेपत्ता झालेल्या वडिलांसह त्यांच्या दोन मुलांचा मृतदेह तापी नदीत आढळून आला. ही घटना शनिवारी दुपारी उजेडात आली. हरसिंग भीमसिंग देवरे (वय ३५), मुलगा आकाश देवरे (वय ८), मुलगी नवसी देवरे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत शिंदखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथे हे कुटुंब गेल्या चार ते पाच वर्षांपासून मजुरीसाठी आले होते. शुक्रवारी दुपारी हरसिंग देवरे, मुलगा आकाश आणि मुलगी नवसी हे जवळील नदीकाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.