जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच भडगाव तालुक्यातील एका ३६ वर्षीय महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉटेलवर नेत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील एका परिसरातील ३६ वर्षीय महिला शिवणकाम करून आपला उदरनिवार्ह करीत आहे. सन २००८ पासून ते १५ मे २०२३ या कालावधीत पर्यंत रिजवान जैनउद्दीन शेख वय ४२, धंदा – ड्रायव्हर, रा.वाल्मिकनगर, मंगलकार्यालय जवळ, चाळीसगाव ता.चाळीसगाव . पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार तिला विविध ठिकाणी यात सुधाशांती लाँज पाचोरा तसेच विलास लॉज जळगांव तसेच चाळीसगांव येथील लॉजचे नांव माहीत नाही आधी ठिकाणी शारीरीक संबंध निर्माण केले आहे.
तसेच इमरान जैनउद्दीन शेख रा. वाल्मिकनगर, चाळीसगाव याने दि. १५ मे २०२३ रोजी फिर्यादी शुध्दीत नसतांना फिर्यादी सोबत पाचोरा येथील सुधा शांती लॉज येथे फिर्यादीचे संमतीशीवाय शारीरीक संबंध केले तसेच रिजवानचा भाऊ इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख व रिजवानची बायको इशरतबी असे फिर्यादीस वारंवार अश्लील शिवीगाळ करुन पिढीतला जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे पीडित महिलेने घाबरून आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र महिलेने अखेर पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेऊन रिजवान जैनउद्दीन शेख इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख, रिजवानची बायको सर्व रा. यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे करीत आहे.