जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून दि.२२ रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली यादी आल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मनसेची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून डॉ.अनूज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपली ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. यात प्रामुख्याने मुंबई, नवीन मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांमधील उमेदवारांचा समावेश आहे. यातच जळगाव शहरातून डॉ. अनूज पाटील यांना उमेदवारी प्रदान करण्यात आलेली आहे. जळगाव नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. के. डी. पाटील यांचे चिरंजीव डॉ.अनूज पाटील हे आहेत.