जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४
विवाहितेच्या पतीने नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा राग आल्याने संशयित नितीन जाधव (रा. दादावाडी) याने महिलेला अश्लिल शिवीगाळ करीत मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना दादावाडी परिसरातील जैन मंदिराजवळ आणि भाऊंचे उद्यान परिसरात घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात महिला वास्तव्यास असून त्या दि. ८ रोजी दादावाडी परिसरातील जैन मंदिराजवळून (एमएच १९, सीएफ २८४०) क्रमांकाच्या कारने जात होत्या. यावेळी नितीन जाधव याने महिलेच्या पतीने त्याची नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा राग मनात ठेवून महिलेच्या कारसमोर दुचाकी आडवी लावून कार अडवली. त्यानंतर महिलेच्या पतीला अश्लिल शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, महिलेने लागलीच तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित नितीन जाधव रा. दादावाडी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे