
नाशिक : वृत्तसंस्था
शिरपूरहून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणारी चारचाकी सोनगीरजवळील रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता कि यात तीन जण जागीच ठार झाले. तर ४ वर्षांची चिमुकलीसह तिघे जखमी झालेली होती. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर गव्हाणे फाट्याजवळ झाला. या अपघातात ४ वर्षीय मुलीचे आई व वडील मृत्यू झाला होता तर त्या ४ वर्षीय मुलीचा ही उपचारादरम्यानच्या मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यतील साक्री येथील मूळ रहिवासी व सध्या उत्तमनगर येथे राहणारे संदीप शिवाजी चव्हाण (४० वर्ष) व त्यांच्या पत्नी मीना चव्हाण हे तीन मुलांसह भाड्याची कार करून देव दर्शनासाठी गेले होते. पुन्हा नाशिकला परतत असताना साेमवारी (दि.१)रात्री उशिरा यांच्या त्यांच्या कारचा व ट्रॅक्टर चा भीषण अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की कारचा चेंदामेंदा झाला. यात संदिप व मीना चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचे चालक हितेश अरुण चौधरी (रा.म्हसरूळ) याचाही जागीच मृत्यू झाला. तर चव्हाण यांची ४ वर्षांची लहान मुलगी जान्हवी (परी) हीचाही उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिची प्राणज्याेत मालवली. मुलगा गणेश (६ वर्ष) व मुलगी साक्षी (१० वर्ष) हे ही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघात एकूण चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संदीप चव्हाण हे स्वतः ही कार चालक होते. त्यांच्या पच्यात आई व एक बहीण तसेच एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी मोरवाडी स्मशानभूमीत अतिशय भावपुर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदपी यांचा मनमिळावू स्वभाय असल्यने व माेठा मित्र परिवार हाेता. त्यांच्य अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात हाेती.
चव्हाण कुटुंबातील एकाच वेळी आई वडील व मुलीचा असा तींघांचा मृत्यू झाल्याने व तिघांचे एकाचवेळी मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. चव्हाण कुटूंबियातील नातलगांनी एकच हंबरठा फाेडल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले हाेते.




















