
जळगाव : प्रतिनिधी
शहरात साडे आठ फुटाच्या अजगराला एका सर्पमित्राने जीवनदान दिल्याची घटना दि.३० रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील नवीन कानळदा रोडवर असलेल्या राजाराम नगर परिसरात दि. ३० जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान नवीन कानळदा रोडच्या बाजूला गवतामध्ये बसलेला होता. यावेळी येथून जाणाऱ्या नागरिकांना येथे दिसला असता येथील निलेश इंगळे नामक तरुणाने सर्पमित्र अमर लोखंडे यास संपर्क साधून त्यांना बोलविले असता. सर्पमित्र लोखंडे याने या साडे आठ फुटाचा व व ७ किलो वजनाचा नर जातीच्या अजगरास पकडून सर्पमित्र लोखंडे याने आडगाव ता.यावल येथील वन विभागात सुखरूप सोडल्याची माहिती लोंखडे याने बोलताना सांगितले.




















