जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले निर्मिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सपके यांना नुकताच चोपड्यातील प्रेरणा दर्पण फाऊंडेशनतर्फे ‘दर्पण पुरस्कार 2022’ नुकताच घोषित झाला होता. हा पुरस्कार अभिनेता समीर चौगुले यांच्याहस्ते दि.7 रोजी देण्यात आला.
चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशन यांनी सामाजिक कार्याची दखल घेवून जळगावातील निर्मिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन प्रभाकर सपके यांना ‘दर्पण पुरस्कार 2022’ हा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण दि.7 रोजी सायंकाळी 5.30 वाजता चोपडा येथील आनंदराज लॉन्स येथे महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम तथा सुप्रसिध्द मराठी अभिनेता समीर चौगुले यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार लताताई सोनवणे, माजी आ.कैलास बापू पाटील, माजी आ.जगदिशचंद्र वळवी, माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा मनिषा चौधरी उपस्थिती होती.
