
मुंबई : वृत्तसंस्था
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची मुलगी अभिनेत्री पलक तिवारीच्या लूकची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे. पलक तिवारीने (Palak Tiwari) पिवळ्या साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या साडीतील तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
पलक तिवारी खूपच ग्लॅमरस आहे, स्टाईलच्या बाबतीत ती आई श्वेता तिवारीलाही मागे टाकते. पलकने साडीसोबत मॅचिंग फुल स्लीव्ह बॅकलेस ब्लाउज कॅरी केला आहे. तिने भारतीय पोशाखाला ग्लॅमरस टच देण्याचा प्रयत्न केल्यामुळे चाहत्यांनी तिच्या सोशल मीडियावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.






















