जळगाव : प्रतिनिधी
परमात्माच चरित्र फार मोठे आहे. आणि हे चरित्र माणसाचं अहंकार दूर करतो.आपण कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक जीवाला कुठे ना कुठे अहंकार आहे. आणि हा अहंकार मनुष्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो.असे रामनवमी निमित्ताने कीर्तनातून ह.भ.प.देवदत्त मोरदे महाराज यांनी भाविकांना सांगितले.
रेल्वे कॉलनीतील श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या परिसरात श्री रामनवमी निमित्ताने ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. श्री मोरदे महाराजांनी रामाचे चरित्रचे वर्णन करून उपदेश दिला की माणसाने आपल्यातला रामाला जिवंत करावा. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते पण आजच्या माणसाला कुठलीच मर्यादा राहिलेले नाही आपण दुसरे सगळे सण साजरे करतो पण
श्री रामनवमी हे लवकर कोणी साजरी करत नाही सगळ्यांनी रामनवमी पण एक सणासारखे साजरी करावी असा उपदेश
त्यांनी उपस्थित भाविकांना दिला.
संगीतसाथ प्रकाश अहिरे व कैलास परदेशी यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे महाराज मनोहर गचके गुरुजी, रुपेश झवर ,सुनिता गांगुर्डे ,सतीश सोमानी, सुनिता सातपुते, सिद्धिविनायक सखी मंडळ, मनोहर अमृतकर, चंद्रकांत चौधरी ,रुपेश माळी, हर्षल सातपुते, लखीचंद जैन ,महेश वाणी, राहुल पाटील, व परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.
