अमळनेर : प्रतिनिधी
येथील व नंदुरबार येथील अहिर सुवर्णकार समाज आणि मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने २५ एप्रिल रोजी मंगळग्रह मंदिरात विशेषत्वाने मांगलिक असलेल्या सुवर्णकार समाजातील महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आदी राज्यातील विवाहेच्छुक आणि त्यांच्या पालकांचा परिचय मेळावा झाला. ६५ उपवर मुला-मुलींचा मंगळग्रह शांतीसाठीचा सामुहिक अभिषेक झाला. यतीन जोशी व मेहुल कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
अहिर सुवर्णकार समाज नंदुरबार येथील कार्यकारिणी सदस्य सतीश प्रभाकर वानखेडे, अध्यक्ष राजेंद्र अभिमन्यू जाधव व अमळनेर सुवर्णकार समाज, सराफ असोसिएशनचे माजी सचिव तसेच विश्व हिंदू परिषदेच्या अमळनेर शाखाध्यक्ष संजय भास्कर विसपुते यांची ही मूळ संकल्पना होती. मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने तीला मूर्त स्वरूप आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी सुभाष विसपुते, उद्योगपती सतीश वानखेडे, राजू जाधव (नंदुरबार), विनोद वर्मा, मदन अहिरराव, रामदास निकुंभ, राजेंद्र वर्मा, दीपक पिंगळे, अशोक अहिरराव, संजय सोनवणे, सुनील वडनेरे, निलेश देवपूरकर, राजू दाभाडे, पिंटू भामरे, बाळू दुसाने (अमळनेर), अजय वाघ, प्रा. जगदाळे (शहादा), जयेश थोरात, विजय दुसाने (निफाड), शशिकांत विसपुते (अंकलेश्वर), प्रकाश घोडके, बापू विसपुते, संजय बागूल (अहमदाबाद), प्रकाश अहिरराव (दोंडाईचा), धनराज विसपुते (पनवेल), शेखर वानखेडे (सावदा), गजेंद्र घोडके, मिलिंद भामरे, शकुंतला सोनगीरकर, माधुरी विसपुते यांनी मंगळदोषा संदर्भातील समज-गैरसमज यावर मार्गदर्शनातून उहापोह केला. दृष्टिकोन बदला-दृश्य बदलेल असा मंत्र देत सकारात्मकतेचा संदेशही दिला. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, सेवेकरी विनोद कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमास साडेतीनशे पेक्षाही समाजबांधव उपस्थित होते. संजय विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. श्रीदीप वानखेडे यांनी आभार मानले.