वृषभ : आज मन अस्वस्थ असेल. चांगल्या कामामध्ये मग्न राहा, ज्यामुळे मनाला समाधान वाटेल. कोणत्याही चांगल्या कामासाठी विचार करत असाल, तर टीमसोबत काम तरा… टीमसोबत एकत्र काम केल्यामुळे यश नक्की मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींसाठी वेळ काढा. दिवस चांगला आहे. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका.
मिथुन: या राशीच्या लोकांनी मानसिक चिंतांना आपल्यावर हावी होऊ देऊ नये. काही अडचण असेल तर त्यावर उपाय शोधा. आता तुम्हाला अधिकृत कामासाठी आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. कार्यालयातील महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागतील. तरुणांना त्यांच्या कामात अचानक बढती मिळण्याची शक्यता आहे, यामुळे त्यांचे करिअरला नवी दिशा मिळू शकते.र्क
कर्क: आज सकस आहार घ्या. कार्यालयीन कामाचा ताण जास्त असणार आहे, त्यासाठी मानसिक तयारी करावी लागेल. जे व्यापारी लोखंडाचा व्यवसाय करतात, ते आज चांगला नफा कमावण्याच्या स्थितीत आहेत. व्यसन करू नका. दिवस चांगला आहे. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका.
सिंह: वायफळ खर्च करू नका. बजट तयार करून पैसे बाजूला ठेवा. प्रत्येक कार्यालयाचे काही नियम असतात. तुम्हीही कार्यालयाचे नियम पाळून वेळेवर पोहोचावे. व्यावसायिकांसमोर काही कायदेशीर बाबी आल्यास सावध राहावे. जे काही करायचे आहे ते विचार करूनच करा. आई जे काही सांगत आहे, ते तरुणांना गांभिर्याने घ्यायला हवं. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या : ऑफिसमध्ये काम करताना काळजी घ्या. सहकाऱ्यांसोबत टीमने काम करा. असं केल्यास यश मिळेल. कोणतही काम एकट्याने होत नाही. त्यामुळे टीमचं मत देखील महत्त्वाचं आहे. कामात केलेला निष्काळजीपणा धोक्याचा ठरू शकतो. रक्तात संसर्ग होण्याची शक्यता आहे, महिलांना अधिक सतर्क राहावे लागेल, हार्मोनल समस्या उद्भवू शकतात. हाय बीपी असलेल्या लोकांनी विसरूनही रागवू नये. आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ : वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्या…. त्यांच्या सल्ल्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. ऑफिसमध्ये नव्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्याव्या लागतील. कठोर परिश्रम करावं लागेल. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळेतून थोडा वेळ जोडीदारासाठी काढला पाहिजे, कारण ते कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थी वर्गातील लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही. या संघर्षाला अपयश मानू नका.
वृश्चिक : तुम्ही उत्साहाने भरलेले दिसणार आहात. नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, त्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे.
धनु : व्यावसायिक संबंध आणि व्यवसायाच्या संदर्भात व्यवहार करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. कामाशी संबंधित सहकार्य येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देतील. प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असाल.
मकर : तुमचा आजचा दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. आजच्या दिवशी तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुमचा दिवस चांगला जाईल. तर मंगळवारी तुमचे नशीब चांगले राहील.
कुंभ : तुम्ही तुमचे विचार आणि वर्तन संतुलित ठेवावे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर कोणतेही आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
मीन : : तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे कराल. तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता येईल. पैशाच्या बाबतीत, लोभाची परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल.