मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात एकनाथ शिंदे व भाजपने सरकार स्थापन केले. त्यामुळे ठाकरे सरकार (Thackeray Govt) कोसळले. यापार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
‘त्या लुक्या आदित्यला आदित्य (Aaditya Thackeray) साहेब म्हणायचं सोडून द्या, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. राणेंच्या या टीकेला आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.
याअगोदरही निलेश राणेंनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. ‘देव धर्मातून एक गोष्ट शिकलो, शत्रूला कधीही डोकं वर काढायची संधी द्यायची नसते. कंसाला मारायला कृष्णाला आणि रावणाला मारायला रामाला पुढाकार घ्यावा लागला. बगळा किती ही साधा दिसला तरी पण तो पाण्यात शिकार करायला उभा असतो, ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका, असे ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते.
दरम्यान शिंदे गटाने शिवसेनेत फूट पडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेची गळती रॊखण्यासाठी आदित्य ठाकरे हे राज्यभरात दौरे करीत आहे. आज ते औरंगाबाद येथे दौऱ्यावर आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत बंडखोरांवर निशाणा साधला.




















