दहिगाव ता यावल : प्रतिनिधी
सावखेडा सिम येथे आदिवासी तडवी भिल्ल समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, एक रुपयात शुभमंगल होणार आहे. समाज बांधवांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सावखेडा सिम येथे सात मे रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आदिवासी एकता प्रतिष्ठान सावखेडा सिम मार्फत करण्यात आलेले आहे. या विवाह सोहळ्यात फक्त एक रुपया शुल्क आकारून विवाह करून देण्यात येणार आहे. या सोहळ्यात वधूचे वय १८ तर वराचे वय २१ पूर्ण असणे आवश्यक आहे. विवाह सोहळा संपल्यावर संघटनेमार्फत वधूवरांना नियमाप्रमाणे भेटवस्तू देण्यात येत आहेत. नाव नोंदणीसाठी समाज बांधवांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क करावा व जास्तीत जास्त नाव नोंदणी करून घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन सर्वधर्मीय ग्रामस्थ व तमाम आदिवासी तडवी भिल्ल बांधव मित्रपरिवार, पंच कमिटी सावखेडा सिम यांचे मार्फत करण्यात आलेला आहे.
यासाठी ईगल ग्रुप तडवी किंग ग्रुप, तडवी वाडा लव किंग ग्रुप, प्रधान वाडा सुख वस्तीगृह, इंदिरा नगर बॉईज, गुलाब नगर ग्रुप क्रिकेट क्लब, पिकेसी जी बी सी क्रिकेट क्लब, क्रिकेट क्लब पी एम सी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.