
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र टहाकळी अंतर्गत टहाकळी गुढी हातनुर काहूर खेड मानपुर या चारही गावांमध्ये कोविड १९ चा दुसरा डोस ९८.५ टक्के पूर्ण झाले असून येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कमलेश तमखाने यांना उत्कृष्ट कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे प्रमाणपत्र प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळ गाव बुद्रुकचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू तडवी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मनोहर कोळी, फार्मासिस्ट आरोग्य एम एम काशीद, आरोग्य सेवक पांडुरंग अवचार, विनोद तथोड, डी बाविस्कर, प्रा शा वैद्यकीय अधिकारी प्रमोद बोंडे व कर्मचारी उपस्थित होते. डॉ तमखाने यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष एस ए भोई ,शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई ,अनिल वाडीले, नामदेव भोई ,भास्कर वानखेडे, विनायक वाडेकर व संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.