यावल :प्रतिनिधी
कोरपावली ता.यावल येथे यावल रावेरचे लोकप्रिय लाडके आ. मा. शिरीष चौधरी यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका काँग्रेस कमिटी आणि जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
माजी सरपंच तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवा फौंडेशन जलील पटेल यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यानंतर गावातील प्रत्येक समाजाच्या काँग्रेसप्रेमी 63 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आ. शिरीष चौधरी यांना 63 व्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिरभाई खान,उपाध्यक्ष अनिलभाऊ जंजाळे,सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे, नईमभाई शेख, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, माहेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी, प्रगतशील शेतकरी पिरण पटेल, माजी उपसरपंच इस्माईल तडवी, समाजसेवक मुक्तार पटेल, ग्राप सदस्य अनुक्रमे सत्तार तडवी, आरिफ तडवी, सिकंदर तडवी, जुम्मा तडवी, अशोक तायडे, जयवंत पाटील, अमोल नेहेते सह ग्रामस्थ तरुण रक्तदाते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदावरी रक्तपतपेढीचे डॉ. नितीन भारंबे, डॉ. सईद शेख, लक्ष्मण पाटील,जय पाटील यांनी योग्यरीत्या 63 रक्तदात्यांचं रक्तदान यशस्वीपणे करून घेतले त्यांना ग्राप शिपाई किसन तायडे, सलीम तडवी यांनी सहकार्य केले सदर रक्तदान शिबिरात रक्तदान करून यशस्वी करणे कामी रिजवान पटेल,तंजिल पटेल,सादिक पटेल,शुभम तायडे, भिमराव इंधटे, रईस पटेल,आरिफ तडवी,सादिक तडवी,मुद्दसर पटेल,सिद्दीक पटेल,अनस पटेल,परेश पटेल,रिहान पटेल,सोहेल पटेल,हमीद तडवी,जहागीर तडवी,भिकारी तडवी, रवींद्र पाटील,हर्षल महाले, सुखदेव इंधटे, मुकदर तडवी,दानिश पटेल,जावेद पटेल,अकिल पटेल,किशोर जावळे,बासिद पटेल,वाहेद पटेल,आवेश पटेल,तन्वीर पटेल,शोयब पटेल,रसूल तडवी सह रक्तदान करून सहकार्य केले.
यावेळी सूत्रसंचालन मुख्यध्यापक शकील तडवी यांनी केले. शेवटी गोदावरी रक्तपेढी तर्फे यावल तालुका काँग्रेस कमिटी आणि जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फौंडेशन यांनामोठ्या प्रमाणात रक्तदान करवून दिल्या बद्दल प्रशस्तीपत्र आणि ट्रॅफि देऊन गौरविण्यात आले.