निंभोरा : प्रतिनिधी
येथे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त सनराईज व्हिजन फाउंडेशन,निंभोरा यांच्या वतीने तरुणांसाठी रोजगार मेळावा व शेतकऱ्यांसाठी मोफत माती परिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चेतना इन्स्टिट्यूटचे संचालक धनंजय चौधरी,प्रल्हाद बोंडे,डॉ एस डी चौधरी, माजी सरपंच डिगंबर चौधरी,नाशिक स्थित टी.डी.के. इंडिया लि. चे अधिकारी मनोज पाटील, वैभव आखरे,धवल प्लेसमेंट,नाशिकचे रवींद्र ब-हाटे,खिरोद्याचे हर्षल बोरोले,सुनील कोंडे, गुणवंत भंगाळे,राजीव भोगे, गिरीश नेहेते,रवींद्र भोगे, विवेक बोंडे,अतुल पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन हर्षल ठाकरे यांनी तर आभार विवेक बोंडे यांनी मानले. राज खाटीक ,किरण कोंडे,जितेंद्र कोळंबे यांसह इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यासाठी परिसरातील अनेक युवा तरुण या कार्यक्रमास उपस्थित होते.त्यातील ७९ तरुणांना आज जागेवर नियुक्तीपत्र देण्यात आल्याने तरुणांनी आनंद व्यक्त केला.
शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण
आ शिरिषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त १७४ शेतकऱ्यांचे माती परीक्षणासाठी नमुने राष्ट्रीय केमिल्कस अँड फर्टिलायझरकडे शेतकऱ्यांनी जमा केले.यावेळी कार्यक्रमास प्रल्हाद बोंडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी मयुर भामरे,पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील,कृषी सहायक राजेंद्र कोंडे,आर सीएफ चे दिपेंद्र साळुंखे,मोहन बोंडे,सुनील कोंडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.