
रविवारी आषाढी एकादशी येत आहे त्या पाश्र्वभूमीवर आम्ही आपल्याला उपवासासाठी काही खास घेऊन आलो आहोत जे तुम्ही घरीच बनवून उपवास उत्तम बनवू शकतात. उपवास आहे म्हणून काय झाले? काहीतरी सकस, पण खमंग खायला पाहीजेच ना. मग चला उपवासाचे दहीवडे बनवूया. कसे करायचे चला बघुया साहीत्य व कृती..
साहीत्य :- दहीवडा
शिजवलेला वरी तांदुळाचा मऊ भात १ वाटी
भिजलेला शाबूदाणा अर्धा वाटी
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट २ टेस्पून
राजगिरा पीठ २ टेस्पून
मीठ चविनूसार
हिरवी मिरची पेस्ट
तेल तळण्यासाठी
दही
भाजलेल्या जिर्याची पूड
कृती :- प्रथम एका पसरट बाऊलमधे भिजलेला शाबूदाणा व वरीचा भात एकजीव करून घ्या. आता त्यामधे दाण्याचे कूट,राजगिर्याचे पीठ, मिरची पेस्ट, थोडी भाजलेल्या जिर्याची भरड पूड व चविनूसार मीठ घालून सर्व मिश्रण हाताने एकजिव मळावे. आवश्यकता भासल्यास राजगिर्याचे पीठ कमी-जास्त करू शकता. जेणेकरून मिश्रणाचा खुटखूटीत गोळा बनवता आला पाहीजे. मिश्रण कडेला ठेवून द्या व वडे तळायच्या आधि २ चमचे दह्यामधे पाणी घालून पातळ ताक वडे बुडवण्यासाठी तयार करा. तसेच वड्यवर घालण्यासाठी घट्ट दही घुसळून त्यामधे चविला साखर व मीठ घालून एकत्र ढवळून घ्या. आता कढईत तेल गरम करा व आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटसर गोळे करून तांबूस रंगावर तळून टिश्यू पेपरवर काढा. नंतर खायला देतेवेळी आधि पातळ ताकामधे बुडवा. दोन -तीन मिनिटानी पाण्यातून काढून हलकेच हाताने दाबून पाणी काढा. व सर्व्हींग प्लेट मधे ठेवा व वरून तयार केलेले घट्ट दही घाला. त्यावर मिरचीपूड व जीरपूड भुरभूरा व खायला द्या. उपवासादिवशी असे थंड दहीवडे खायला खूपच छान लागतात. तेलकटही वाटत नाही. तूम्हीही करून बघा नक्की आवडतील.






















