भुसावळ : प्रतिनिधी
येथील डॉ. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना डॉ.जगदीश पाटील लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती हा ग्रंथ भेट देण्यात आला.
यावेळी हभप लक्ष्मण महाराज, डॉ. सुनील नेवे, डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते.
श्री खडसे यावेळी म्हणाले की, भक्ती हा ग्रंथ संत एकनाथांच्या चरित्राबरोबरच त्यांच्या अभंगातील नवविधा भक्ती कथन करत असल्याने या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या अभंगाचे विश्लेषण झाले आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचकांना व संशोधकांना संदर्भ म्हणून लाभदायी ठरणार आहे. संतांनी केलेले कार्य हे अजरामर आहे. देवाची भक्ती करण्याबरोबरच संतांनी समाजाच्या उद्धाराचे देखील काम केले आहे. त्यामुळे संतांचे कार्य हे दिशादर्शक आहे. संतांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केलेली आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून नवसंशोधक व लेखकांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहनही एकनाथराव खडसे यांनी केले.