
मनवेल ता.यावल : प्रतिनिधी
यावल एस.टी.आगाराची बस थोरगव्हाण गावाकडे जात असताना थोरगव्हाण कडुन पिळोदा खुर्द फाटाकडे मोटारसायकलने येत असलेला युवक वेगाने मोटारसायकल चालवित असताना समोरून आलेल्या बसला टक्कर देत जखमी झाला असून त्याला उपचार करण्यासाठी जळगाव येथे रुग्णालयात हालविण्यात आले आहे.
यावल आगाराची बस क्र.एमएच १४ बीटी.१८७३ थोरगव्हाण कडे जात असताना थोरगव्हाण कडुन येणारा मोटारसायकल क्र,एमएच १९ डीएन ९९८५ चालक राज साळुंके भरधाव वेगाने एसटी ला धडस देत आदळला गेला हि घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली.
पिळोदा खुर्द फाटा जवळ सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाचा ठिकाणी सदर युवक देखरेख करीता कामावर होता.कानात ईयर फोन लावून मोबाईलवर संभाषण सुरु असताना समोरून येणारी बसची भान नसल्यामुळे चक्क बसवर आदळल्याने जखमी झाला आहे. यात एसटी ची काच फुटून नुकसान झाले आहे.
जखमी युवकाल तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.




















