
मुंबई : वृत्तसंस्था
सध्या सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ अफाट व्हायरल होत असतो. या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून अनेक व्यक्ती प्रसिद्धी झोतात येत असतो. मध्यंतरी अशाच एका कच्चा बदाम गाणाऱ्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी खुप पसंती दिली होती. या व्हिडिओनंतर आता आणखीण एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ देखील चर्चेचा विषय ठरतोय.
या व्हिडिओत काय?
कच्चा बदामसारख्या व्हिडिओ प्रमाणेच आता एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भेळ पुरी विकणारी महिला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर जबरदस्त अॅक्टींग आणि एक्सप्रेशन देताना दिसतेय.संगीता हातात पाण्याची बॉटल घेऊन माधुरी दीक्षितच्या ‘बडा दुख दिना’ या गाण्यावर दिलखेच एक्सप्रेशन देतेय.व्हिडिओतल्या तिच्या एक्सप्रेशनची नेटकरी प्रशंसा करतायत.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ संगीता गायकवाड नावाच्या इन्स्टा हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळालेत.तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट करत आहेत. एका युझरने “ताईने काय एक्सप्रेशन दिले आहे, असे कॅप्शन दिले आहे, तर दुसऱ्या युझरने ‘वाह काकी खूप छान’ अशी कमेंट करत त्यांना दाद दिली आहे.






















