रावेर : प्रतिनिधी
तालूक्यातील विवरे खुर्द येथील चिनावल रस्त्यावर राहात असलेल्या शेतकरी हिरामण सोनजी सांवत वय ( ६३ ) यांनी दि. ३१ गुरूवार रोजी राहत्या घरी छताच्या लोखंडी रॉडला साडी बांधून आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर असे की चिनावल रस्ता भागातील रहीवासी शेतकरी हिरामण सोनजी सांवत यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. निभोरा पोलिसात सदाशिव सोनजी सावंत रा. विवरे खुर्द यांनी फिर्याद दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास सह. पो. नि. गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. विकास कोल्हे तपासकरीत आहे. मयताचे शवविच्छेदान रावेर ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी. दोन मुले. एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. ते समाधान सावंत, पंकज सावंत यांचे वडील होत.