जळगाव : प्रतिनिधी
अप-12628 नवी दिली-बेंगरुळु कर्नाटक एक्स्प्रेसच्या S2 डब्याला आज दुपारीच्या वेळेस नेपानगर जंगलात आग लागल्याची घटना समोर आलीय. रेल्वे चाकांच्या घर्षणातून आग लागल्याने एका डब्यातील प्रवाश्यांना चटके बसल्यामुळे आग लागल्याचे निदर्शनात आले. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला कुठलीही दुखापत झाली नसल्याचे समजते.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश मधील नेपानगर जंगलात अप कर्नाटक एक्स्प्रेसला आज रविवारी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना समोर आलीय. रेल्वे चाकांच्या घर्षणातून एका डब्याला आग लागल्याचे प्रवाश्यांच्या निदर्शनात आले. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, गार्ड तसेच नागरिकांनी पाणी आणि फायर एक्सतुगशार ने आग विझवली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजतेय.
त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला व सर्व प्रवाशी आपला जीव वाचवून रेल्वे खाली उतरू लागले. दरम्यान, गार्ड तसेच नागरिकांनी पाणी आणि फायर एक्सतुगशार ने आग विझवली.



















