पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा येथील राज्य शासनाचा कृषी विभाग व निर्मल सिड्सचे संयुक्त विद्यमाने कापूस पीक परिसंवाद कार्तक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरिय खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, रावसाहेब पाटील, आत्माचे अध्यक्ष रमेश बाफना, आदर्श शेतकरी विस्वाराव शेळके, शांताराम सोनजी पाटील, प्रकाश देशमुख , शिवदास पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सारोळा बुद्रुक रोडवरील समर्थ लॉन्स येथे झालेल्या कापूस पीक परिसंवाद कार्यालयात कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथील डॉ. डी. बी. चौधरी यांनी कापूस लागवड व तंत्रज्ञान, डॉ. हेमंत बाहेती कापूस पिकावरील किड व रोग तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र पाल येथील समन्वयक डॉ महेश महाजन यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन, डॉ. वैभव सुर्यवंशी यांनी कापूस पिकावरील यांत्रिकीकरण, प्रा. सुदामसिंग राजपूत यांनी कापूस पीक व्यवस्थापन, उपसंचालक अनिल भोकरे यांनी एकात्मिक पीक व्यवस्थापन व कापूस उत्पादक वाढिच्या योजना, निर्मल सिड्सचे वनस्पती रोग शास्रज्ञ प्रा. किशोर पाटोळे यांनी कापूस पिकाच्या शाश्वत विकासासाठी जैविक उत्पादनाचा वापर तर तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी आदर्श बाजार व्यवस्था व शेतकऱ्यांचे उन्नतीचा राजमार्ग यावर सविस्तर माहिती दिली.
आमदार किशोर पाटील व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला उपक्रम राबविल्याने कृषी विभाग व निर्मल सिड्सचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव तर सुत्रसंचलन कषी सहायक उमेश पाटील व विद्या पानपाटील यांनी केले.
या कार्यक्रमात सन – २०१८ ते २०२१ या तीन वर्षांत राज्य शासनाचा कृषी पुरस्कार मिळालेल्या विश्वासराव शेळके (लोहारा), अनिल सपकाळे (जळगांव), रविंद्र महाजन (जामनेर), समाधान पाटील (एरंडोल) यांना सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी शेतकरी गोकुळ परदेशी, अर्जुन पाटील, अजय देशमुख, बाळकृष्ण भटकर, अशोक पाटील, उत्तम पाटील, आर. आर. पाटील ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, सुनील पाटील, निलेश राजपूत सह तालुका भरातील अनेक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मल शिड्सचे झोनल मॅनेजर रविंद्र बागुल, रवी चोरपगार, कृषी मंडळ अधिकारी अशोक जाधव, एस. आर. मोहिते, के. एन. घोंगडे, एस. ए. पाटील, आर. पी. पाटील, शंकर धनराळे, सचिन भैरव, विद्या पानपाटील, उमेश पाटील यांनी सहकार्य केले.