चाळीसगाव : प्रतिनिधी
वार्षिक साडे पाच कोटीची आर्थिक उलाढाल असणा-या आणि जिल्हा बँकेंने गौरविलेल्या खेडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत अविनाश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॕनलने सर्व १३ जागा जिंकून सलग तिस-यांदा विजयी सलामी दिली आहे. प्रतिस्पर्धी प्रफुल्ल साळुंखे व पंकज साळुंखे यांच्या पॕनलचा धुवा उडाला. अविनाश चौधरी यांना सर्वाधिक ६५९ मते मिळाली. या रणधुमाळीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
खेडगाव, खेडी व दस्केबर्डी या गावांचे कार्यक्षेत्र असणा-या सोसायटीच्या निवडणुकीसाठी महिला राखीवसह ओबीसी, अनु. जाती – जमाती, व कर्जदार खाते प्रतिनिधी अशा एकुण १२ जागांसाठी चुरशीची लढती झाल्या. संस्थेचे १६५० सभासद आहे. सहकार पॕनलचे भानुदास लुका रावते हे भटक्या – विमुक्त गटातून बिनविरोध निवडून आले आहे. यामुळे प्रतिस्पर्ध्यांना विजयाचे खातेही उघडता आले नाही. रविवारी सकाळी ८ ते दुपारी चार यावेळात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर मतमोजणी करण्यात आली. यात सहकार पॕनलने प्रतिस्पर्धी पॕनलचा धुव्वा उडवला
निवडणुक यशस्वी करण्यासाठी अरुण पाटील, के.बी.साळुंखे, रावसाहेब साळुंखे, मोहन चौधरी, पांडुरंग माळी, देवीदास साळुंखे, खेडी सरपंच संजय हिंमत पाटील, हिंमत महाजन, आर. डी. चौधरी, परमेश्वर रावते, दगडू पाटील, दस्केबर्डी सरपंच गणेश अहिरे, शब्बीर सुलेमान पिंजारी, जयराम पांडू पाटील, संभाजी साळुंखे, संभाजी बारीकराव साळुंखे, रमेश सोनवणे, शांतीलाल अहिरे, सचीव संजय पाटील यांनी सहकार्य केले.