अमळनेर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे नेते संकटमोचक संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आरोग्यशिबीर राबवून हजारो नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविल्या. असे आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून साजरा करण्यात आला.
आरोग्यदूत गिरीश महाजन यांच्या वाढदिवस निमित्त रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा डोळ्यासमोर ठेवून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे भाजप युवा मोर्चा तर्फे फळ वाटप करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भा.ज.यु.मो महाराष्ट्र प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे, मा.कृ.ऊ.बा सभापती प्रफुल्ल पवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगीराज चव्हाण,तालुकाध्यक्ष शिवाजी राजपुत, शहराध्यक्ष पंकज भोई, सरचिटणीस राहुल चौधरी, सौरभ पाटील, हिरालाल पाटील, शिवकिरण बोरसे, निखिल पाटील, कपिल पाटील, तसेच डॉ. सुमित पाटील, सुजित धनगर, चेतन पाटील आदि भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.