जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कुसुमताई फाउंडेशनतर्फे दि २६ रोजी इंद्रप्रस्थ नगर इ.१०वी व १२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. तसेच करीयर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवाडे यांच्यातर्फे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही व पेन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला सर्व प्रमुख मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तद्नंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रामुख्याने १०वी व १२वी तील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनाचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती सागर सपकाळे, ईश्वर मोरे, एजाज एम.शेख, सुमित्र अहिरे सर, राजू पटेल, सचिन बिऱ्हाडे, मुकेश सावकारे, नितीन मोरे, अमजद रंगरेज,अनिल बोरा, प्रदीप सोनवणे, चेतन धनके, सुनील देहडे,ऋषभ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सुरवाडे यांनी केले तसेच सूत्रसंचालन सुनील देहडे व आभार सागर सपकाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय सुरवाडे, सागर सपकाळे, नितीन मोरे,विजय गायकवाड, कैलास जैन, जितेंद्र सोनवणे, देवनांद निकम,खुशाल सोनवणे, वृषभ चव्हाण,शुभम घाटे,योगेश कळसकर यांनी मेहनत घेतली व परिसरातील मोठया संख्येने महिला व युवा मित्र उपस्थित होते.