
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि शिंदे गट एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा गट तर एका बाजूला शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे याचा गट आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. पण एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे खासदार राजन विचारे यांनी मात्र शिंदे गटाला पाठिंबा दिलेला नाही. राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील फुटीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील आमदार, खासदारांसह आता नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
या पत्रात खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ठाण्यातील शिवसेनेचा पहिला विजय यासह धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी या पत्रात राज विचारे यांनी सांगितल्या आहेत. ‘असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण आज तुमची जरा जास्तच आठवण येतेय साहेब. वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो .. धडपडलो ..ह्या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझ्यासोबत.. अजूनही आहात ..अंधारात वाट दाखवत, असं या पत्रात म्हटले आहे.





















