जळगाव : प्रतिनिधी
जळगाव येथील बळीराम पेठ येथे छत्रछाया फाऊंडेशन या नव्या सामाजिक संस्थेचे उदघाटन, प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात मेरिको कंपनी मध्ये सिनिअर एच. आर ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले विषाखा बापट या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. छत्रछाया फाउंडेशनला कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल तर ती मी नक्की करेल आणि संस्थेची सगळी उद्दिष्टे पूर्ण होवो असे मत त्यांनी मांडले. त्याचबरोबर सुनिता वाडीकर यांनी छत्रछाया फाऊंडेशनचे उद्दिष्ट व थोडक्यात माहिती दिली.
सुंदर विचार आणि उत्तम संस्कार या वाक्याला घेत सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम छत्रछाया फाउंडेशनच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. महिला मुले व वृद्ध समाजातल्या प्रत्येक घटकावर छत्रछाया फाउंडेशन हे काम करणार असून २ एप्रिल ते १० एप्रिल या दरम्यान रामरक्षा पठण, संस्कार वर्ग घेतले जाणार आहेत. तसेच १० एप्रिल रामनवमी दिनी स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. यावेळी व्यासपीठावर छत्रछाया फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल पाटील, फाऊंडेशनचे सचिव रिद्धी वाडीकर उपस्थित होते.
दरम्यान, लाता पाटील यांच्या स्मरणार्थ वह्यांचे वाटप, तर रवि करंजे यांच्या वतीने रामरक्षेचे पुस्तक देण्यात आले. यावेळी छत्रछाया फाउंडेशन ची कार्यकारणी घोषणा करण्यात आली. अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष छाया पाटील, सचिव रिद्धी वाडीकर, कोषाध्यक्ष सुनिता वाडीकर सदस्य शीला पाटील, डॉ. विवेकानंद जोशी, डॉ. विपुल पाटील, विवेकानंद पाटील, राशी पाटील, हर्षल चौधरी, मयुरी वाडीकर. यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी वाडीकर यांनी, तर आभार केले रिद्धी वाडीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विपिन पाटील, जयंत पाटील, कुणाल महाजन, राम करंजे, संगिनी पाटील, सेजल ठाकरे यांचे सहकार्य लाभले.
