
जळगाव : प्रतिनिधी
प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे महानगरपालिकेच्या कोट्यातील निधी प्राप्त होवुन सुध्दा रस्त्यांची कामे सुरू होवु शकली नाही. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी अवस्थ शहरात निर्माण झाली आहे. पावसाळ्यात नवीन रस्त्यांची कामे सुरू करता येणार नसल्याने नागरीकांचे भयानक हाल होत असुन तात्पुरता दिलासा म्हणुन बांधकामाचे वेस्ट मटेरियल किंवा मुरूम / विटांचा कच टाकुन रस्त्यांची दुरूस्ती त्वरीत करण्यात यावी.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले आहेत. त्यामुळे डासाचे प्रमाण वाढलेले असून साथीचे आजार पसरण्यची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्वरित रस्त्यातील खड्डे बुजवण्यात यावे असे निवेदन आपणांस खालील सही करणारे जळगाव शहर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त देत आहोत.
तरी शहरातील रस्त्यातील खड्डे त्वरित न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, सुरेखाताई तायडे,गायत्रीताई राणे, दीपमालाताई काळे, शोभाताई बारी, नगरसेवक महेश चौधरी, विजय वानखेडे, मयूर कापसे, जितेंद्र मराठे, सुरेश सोनवणे, विजय पाटील,मंडल अध्यक्ष शक्ती महाजन,मोहम्मद नूर, मोर्चा अध्यक्ष लताताई बाविस्कर, रेखा पाटील, शालू जाधव,वर्षा सपकाळे, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, गणेश माळी, प्रशांत सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.





















